Monday 26 December 2016

स्त्रीचा ‘पाय घसरण्या’ची कारणे...

स्त्रीचा ‘पाय घसरण्या’ची कारणे...

लग्नसंस्थेने बांधून दिलेल्या व्यक्तीची प्रतारणा करीत जेव्हा इतर व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवले जातात तेव्हा सदरहू व्यक्तीचा पाय घसरला असे समजले जाते. पुरुषाऐवजी स्त्रीकडे समाजाची बोटे अधिक उठत असल्याने स्त्री अशी का वागली याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला जात नाही. पुरुष तर निसर्गतःच स्त्री दिसली की घसरत जात असतो! तो त्याचा मूळस्वभाव आहे. पण तरीही स्त्रीने असे वागणे चुकीचे का ठरविले जाते न कळे! स्त्रीचा पाय घसरण्याची कारणमीमांसा पुरुषाने वेळीच केली तर त्याला पायबंध घालणे सोयीस्कर जाते... –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)पुरुषाकडे आकर्षित होऊन, त्याच्या मधुर बोलण्याला भाळून, त्याच्यावर अनुरक्त होत सर्वस्व बहाल करण्याचे कारण वयात येण्याच्या नाजूक वळणावर घडत असते. संप्रेरकांच्या अधिपत्याखाली भले-बुरे, चांगले वाईट, योग्य-अयोग्य याचा निर्णय न घेता धाडसीपणाने हे पाऊल उचलले जाते. या अजाणत्या वयात घसरलेल्या पायाचे परिणाम स्त्रीलाच अधिक भोगावे लागतात. पुरुष नामानिराळाच राहतो!
२)लग्नानंतर अनेक कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांची ओझी वाहतांना स्त्री पिचून जाते. अशावेळी पुरुषाची साथ-सोबत व्यवस्थित मिळाली तर ठीक नाहीतर स्त्रीला प्रेम, आधार यासाठी परपुरुषाच्या खांद्यावर डोके टेकविणे भाग पडू शकते. हा दुसरा पुरुषही ‘कामा’पुरताच खांदा देऊ करतो हे विशेष!
३)विभक्त कुटुंब पद्धतीमुळे त्रिकोणी कुटुंबांची संख्या कमालीची वाढली आहे. या स्थितीत घरातील कर्तव्ये, ऑफिसची कामे उरकतांना स्त्री थकून जाते. वेळीच पुरुषाने त्याचा वाटा उचलला नाही तर ती सैरभैर होऊन जाते. ऑफिसमधील एखादा पुरुष सहकारी जर तिचे सांत्वन करण्यास पुढे आला तर स्त्री सर्वथा मोकळी होण्यास मागेपुढे पाहत नाही.
४)स्त्रीला आपल्या घरात जवळच्या व्यक्तींचा वावर आवडत असतो. आजूबाजूला अनेक नात्यातील किंवा चांगल्या ओळखीच्या व्यक्ती असल्यास तिला नसर्गिकरित्या सुरक्षितता आणि आधार मिळाल्याचे समाधान लाभत असते. नेमके याचीच वानवा निर्माण झाल्यामुळे स्त्री आधाराच्या शोधार्थ घसरू शकते!
५)पुरुषाकडून पुरेसे प्रेम, हुरहूर लावणारा प्रणय आणि उल्हासित करणारी कामक्रीडा होत नसेल तर तिला सेक्समध्ये रुची निर्माण होत नाही. तिची अपूर्ण राहिलेली ती सूप्त इच्छा ऑफिसमध्ये किंवा इतर कोणत्याही ठिकाणी हैप्पी गो लकी सारख्या जॉली स्वभावाच्या, नेहमी हसतमुख असणाऱ्या, विनोदी आणि खेळकर-खोडकर पुरुषाच्या सहवासात आल्यावर उचल खाते आणि नकळत पाय घसरून जातो...
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com 

No comments:

Post a Comment