Monday 26 December 2016

स्त्रीपेक्षा पुरुषच देखणा!

स्त्रीपेक्षा पुरुषच देखणा!

स्त्री सौंदर्य पुरुषाला भुलवते हे नक्की, मात्र मूलतः पुरुषच स्त्रीपेक्षा अधिक सुंदर, देखणा आणि आकर्षक असतो. निसर्गनियमानुसारच पुरुषाची शरीरयष्टी रेखली जात असते. मानवेतर प्राण्यांमध्ये नर हे मादी पेक्षा कैक पटीने अधिक सुंदर आकर्षक आणि देखणे असतात. त्याला पुरुष अपवाद कसा असेल? स्त्री कधीच सुंदर, देखणी आणि आकर्षक ठरू शकत नाही! हे विवेचन स्त्रियांनाच काय पुरुषांना देखील रुचणार नाही परंतु नुकत्याच पार पडलेल्या संशोधनाच्या आधारे हे स्पष्ट होते की पुरुष नेहमीच देखणा राहिलेला आहे. –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.in
१)स्त्री जेव्हा वयात येऊ लागते तेव्हा तिची शारीरिक वाढ होतांना तिचे स्त्रीत्व दर्शविणारे अवयव पुष्ट होत जातात. स्त्रीचे स्तन, नितंब, मांड्या वाढतात. हे भाग वृद्धिंगत होतात म्हणजे ते अवयव ‘वाढत’ नसतात केवळ त्यातील चरबी हा घटक वाढतो!
२)सदरहू सौंदर्यस्थळे पुरुषाच्या मनावर पूर्वापार चालत आलेल्या चुकीच्या संस्कारामुळे ते अवयव आकर्षक ठरविले जाऊन ज्या स्त्रीची उपरोक्त स्थाने अधिक पुष्ट तीच स्त्री अधिक सुंदर असा कयास मांडला जातो, जो सर्वथा चुकीचा आहे!
३)स्त्रीचे वाढणारे किंवा वाढलेले अवयव हे निसर्गाने योजिलेल्या वंशवृद्धी, अपत्यपालन, अपत्यांचे भरण-पोषण याच कार्यासाठी निर्माण होत असतात. त्यांचे कार्य संपुष्टात आल्यानंतर ते अवयव काही ‘कामा’चे राहत नाहीत, हा सर्वांचा अनुभव आहेच की!
४)याउलट पुरुष वयात येतांना तो जे जे अन्न ग्रहण करतो त्याचे स्नायूंमध्ये रुपांतर होण्याचा वेग स्त्रीच्या तीसपट अधिक असतो. स्त्री वयात येतांना जे भक्षण करते ते सर्व चरबीच्या स्वरुपात सदरहू अवयवांत साठविले जाते!
५)पुरुषाला वयात येतांना दाढी-मिशा येतात, त्याचा आवाज दमदार आणि घोगरा होऊन शब्दांत भारदस्तपणा येतो, कोणतेही अचाट आव्हान पेलण्याची ऊर्जा अंगी सळसळते… अशा सर्व घडामोडी ज्या की त्या त्याच्या पौरुषत्वाचे व्यवछेदात्मक लक्षण असते. शिवाय त्याचे स्नायू पुष्ट होऊन तो अंगाने राजबिंडा, दाढी-मिशांमुळे देखणा, पिळदार स्नायुंमुळे आकर्षक आणि रुबाबदार चालीने उमदा तरुण दिसू लागतो. तसे स्त्रीचे अजिबात नसते. म्हणूनच पुरुष स्त्रीपेक्षा नेहमीच देखणा असतो!
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in  

No comments:

Post a Comment