Tuesday 6 December 2016

योनीची रचना...


योनीची रचना...

आजही सेक्स ही अंधारात केली जाणारी कृती असून पुरुषाला आपल्या शिस्नाचा स्त्रीच्या योनीत होणारा प्रवेश स्त्रीकडूनच करून घ्यावा लागतो! काही पुरुष अंदाजानेच योनीत लिंगप्रवेश करू शकतात. पहिल्या प्रयत्नातच योनिद्वार सापडले आणि लिंग प्रवेश सहज झाला असे कधीच होत नसते. स्त्रीच स्वतःच्या हाताने लिंगाला योग्य मार्ग दाखवून शिस्न आपल्या योनीत सारून घेत असते. स्त्रीला संभोगावेळी उजेड असलेला आवडत नसल्याने योनीची नेमकी शरीररचना पुरुषाला अवगत होत नाही. स्त्रीचा ‘गुह्येंद्रीय’ भाग शब्दाप्रमाणेच गहन, अगम्य राहतो. योनिद्वार नेमके कुठे आहे हे पुरुषास ‘यशस्वी संभोगाच्या’ हेतूने माहीत असावयास पाहिजे.  –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)पुरुषाचे गुह्येंद्रीय म्हणजेच शिस्न हे पाहताच क्षणी लक्षात येते. तसे स्त्रीच्या योनीचे नसते. स्त्रीच्या गुह्येंद्रियात मदनिका, मूत्रद्वार आणि योनिद्वार असे छुपे शरीर प्रदेश असतात. छुपे अशासाठी की ते सहजासहजी दिसत नाहीत. मोठे भगोष्ठ आणि आतील लहान भगोष्ठ यांनी वरील तिन्ही रचना पूर्णतया झाकून ठेवलेल्या असतात. योनिभगोष्ठ विलग झाल्याशिवाय ते दिसत नाहीत. हे प्रदेश संभोगाच्या दृष्टीने महत्वाचे असून त्यांची रचना पुरुषाला जाणून घ्यावीच लागते.
२)पुरुषाचे लिंग गुदद्वारापासून बरेच वरील दिशेला असते तर स्त्रीची योनी गुदद्वारानजीकच एक ते दोन इंचावर असते. त्यामुळे योनिद्वारात शिस्न प्रविष्ट करतांना स्त्रीने आपल्या मांड्या विलग करून वर उचललेल्या असाव्या लागतात. तरच उपरोक्त तीनही प्रदेश दिसू शकतील. या तीनही रचनांमध्ये काही सेंटीमीटर अंतर असल्याने हे भाग अगदी जवळजवळ एकवटलेले असतात.
३)महाभगोष्ठ विलग केल्यावर वरील टोकाला मदनिका किंवा शिस्निका असते. पुरुषाचे शिस्न जेथे असते, त्याच ठिकाणी मदनिका असते. फक्त त्यांतून मूत्रविसर्जन होत नाही. मात्र शिस्निकेच्या उद्दिपनाने स्त्रीला कामोत्तेजित करता येते तसेच ती कामतृप्तही होते. मदनिकेला हळुवार स्पर्श अधिक सुखद वाटतो. स्त्रीचा हा तसा बराच नाजूक अवयव समजावा.
४)महाभगोष्ठ विलग केल्यावर आतून पातळ त्वचेचे लघु भगोष्ठ असते. लहान पाकळ्या वरील बाजूस एकत्र येऊन शिस्निकेला जोडलेल्या असतात. त्या बिंदू खाली मूत्रद्वार असते. काहीवेळा शुचिता पाळली न गेल्यामुळे लगेच इन्फेक्शन होऊन स्त्रीला मूत्रदाह (उन्हाळी लागणे) होतो. बहुदा पहिल्या रात्रीनंतर हा त्रास होतो म्हणून त्यास हनिमून सिस्टायटीस म्हणतात.
५)मूत्रद्वाराच्या खालील बाजूस योनिद्वार असते. हे एका पातळ त्वचेने झाकलेले असते, ज्यास योनीपटल म्हणतात. प्रथम संभोगाच्यावेळी हे विदीर्ण होते, फाटते या बदलास कौमार्यभंग म्हणतात. परंतु काही व्यायाम प्रकार, सायकलिंग यांमुळेसुद्धा ते फाटू शकते. ते पटल अविद्ध असणे म्हणजे स्त्री कुमारी आहे, किंवा ते फाटले तर स्त्रीचा आधी पुरुषाशी शरीरसंबंध झाला होता या शंकांना वाव देता येत नाही. योनीद्वारातून लिंगप्रवेश केला असता शुक्राणू गर्भाशयापर्यंत पोहोचले जातात.
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com  

No comments:

Post a Comment