Tuesday 6 December 2016

स्त्रीच्या गुह्येंद्रियाचे कार्य...

स्त्रीच्या गुह्येंद्रियाचे कार्य...

पुरुषाला जसे स्वतःच्या लिंगाचे आकर्षण असते तसे स्त्रीला स्वतःच्या योनीबद्दल आकर्षण नसते. याला प्रमुख कारण म्हणजे पुरुषाची कामोत्तेजित करणारी केंद्रे शिस्नात एकवटलेली असतात. तर स्त्रीची कामोत्तेजित करणारी केंद्रे मान, गळा, ओठ, पोट, स्तने, मदनिका अशी सर्वांगीण असतात. स्त्रीच्या योनीची रचना माहिती झाल्यावर त्यांतील प्रदेशाचे कार्य माहीत करून घ्यावे लागते. कारण मदनिका, मूत्रमार्ग आणि योनी यांचे कार्य पूर्णतः वेगवेगळे असते. –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)मदनिका किंवा शिस्निका या प्रदेशाच्या हळूवार उत्पिडनाने स्त्री कामोत्तेजित होते. कामसंवेदनांचे ग्रहण केंद्र शिस्निकेच्या ठिकाणी असते. या संवेदनामुळे मदनिका शिस्नासारखी ताठर होते परंतु तिची लांबी आत शोषली गेल्याने बाहेरून शिस्निका उत्तेजित झाल्याचे दिसत नाही.
२)मुत्राद्वारातून मूत्र बाहेर टाकले जाते. कामक्रीडेत या प्रदेशाचा सहभाग जवळजवळ नसतोच. मात्र संभोगापूर्वी मूत्रविसर्जन करावे, कारण जोराची लघवी लागलेली असतांना केला जाणारा संभोग कष्टदायक ठरू शकतो. किंवा कामतृप्ती नंतर जी शिथिलता येते तेव्हा अनाहूतपणे मूत्र विसर्जित होण्याचा संभव असतो.
३)कामोत्तेजित झाल्यावर मुत्रद्वाराच्या खाली असलेल्या योनीद्वाराचे काही प्रमाणात विस्फारण होते. योनीत कामसलील स्रवू लागते व योनीमार्ग ओलसर आणि शिस्नप्रवेशासाठी गुळगुळीत होऊन जातो. योनीच्या भोवती स्नायूंचा वेढा असल्याने लिंगाला पकडून ठेवणे त्यावर दाब देणे असे कार्य घडून येते.
४)वरील विवेचन वाचल्यास असे लक्षात येईल की स्त्रीच्या योनीतील तीनही शरीर भाग वेगवेगळे कार्य करतात. शिस्निका पुरुषाच्या शिस्नाप्रमाणे कामोद्दीपित होण्याचे कार्य करते मात्र त्यातून पुरुषाच्या लिंगासारखे वीर्य बाहेर पडत नाही किंवा त्यांतून मूत्रसुद्धा येत नाही. कामतृप्तीसाठी हे केंद्र उत्तेजित राहणे आवश्यक असते.
५)योनीमार्गाच्या आत दीड ते दोन सेंटीमीटर नंतर संवेदना नाहीशा होत असल्याने संभोगादरम्यान योनीचे कार्य केवळ लिंगाला घट्ट पकडून उत्तेजित ठेवणे इतकेच असते! त्यामुळे पुरुषाचे लिंग लांब असले काय, आखूड असले काय किंवा कमी जाडीचे असले काय योनीमार्गाला शिस्नाच्या लांबी-जाडीच्या संवेदना जाणवत नसतात. म्हणून योनीमार्गात शुक्राणू पोचवणे इतकेच कार्य लिंगाकडून अपेक्षित असते. योनीमार्ग पुढे वीर्यग्रहणाचे कार्य करतो. तसेच ऋतूस्राव आणि अपत्याचा जन्म योनीमार्गेच होतो.
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com  

No comments:

Post a Comment