Saturday 24 December 2016

व्यभिचार...


व्यभिचार...

हा शब्द उच्चारला तरी कंप सुटू शकतो. या शब्दांत विश्वासाचा लवलेश नाही. विश्वासघात करून इतर व्यक्तींशी ठेवलेले अनैतिक शारीरिक संबंध म्हणजे व्यभिचार म्हणता येईल. लग्नसंस्थेचा मूळ पाया एकनिष्ठत्व, विश्वास आणि प्रेम यांवर आधारित असतो. त्या पायाला सुरुंग लावणारा हा शब्द आहे. पण काही स्त्री-पुरुष या शब्दाचा अर्थ माहीत असूनही का उंबरठा ओलांडतात? याचे उत्तर शोधले पाहिजे. –भोगगुरू कामदेव.   kaamvishva.blogspot.in
१)लग्नसंस्थेचा प्रमुख तोटा म्हणजे ‘नारळ कसा निघेल तो वरून सांगता येत नसतो’ हा आहे. स्वभाव जुळतीलच याची शाश्वती नाही, बेडवर सर्वकाही मनसोक्त घडेलच याचीही काही खात्री देता येत नाही. अशा अधांतरी दुव्यांवर भरवसा ठेऊन लग्न होते आणि काही दिवसांतच दांपत्ये एकमेकांना टाळू लागतात!
२)संसार-प्रपंच म्हटलं की कर्तव्ये-जबाबदाऱ्या आल्याच. त्यांचे ओझे वाहत वाहत जीव मेटाकुटीला येत असतांना रात्री बेडवर एकमेकांची ‘हौस’ पुरी करण्याचे त्राण आजकालच्या स्त्री-पुरुषांत उरलेले नसते. मग रात्री रंगात आलेला पुरुष श्रांतलेल्या स्त्रीला ‘फ्रीजीड’ अथवा ‘थंड प्रतिसादाची’ म्हणवून हिणवतो किंवा रात्री उल्हसित आणि उत्साही झालेली स्त्री थकून-भागून घरी आलेल्या पुरुषाला ‘षंढ’ म्हणण्यास मागेपुढे पाहत नाही!
३)अशा कैक रात्री एकाकी हळहळण्यात गेल्या की बाहेर कुठेतरी शारीरिक सुख शोधण्याचा प्रयत्न होतो. तहानलेल्या धरतीला पाण्याची आस असते, भणाणलेल्या वाऱ्याला थोपविण्यास शीतल वनराईची गरज असते तसेच स्त्री-पुरुष दुसरा साथी शोधू लागतात आणि सो कॉल्ड व्यभिचार घडून येतो. काही व्यक्तींचा व्यभिचार चव्हाट्यावर येतो, काहींचे संबंध तसूभरही उघडकीस येत नसतात!
४)दुसऱ्या व्यक्तीला पसंत पडावे, आवडावे, त्या व्यक्तीचे प्रेम अधिक वृद्धींगत व्हावे यासाठी खास तयारी करूनच भेटायला जाणे होते. आकर्षक दिसण्यासाठी स्त्रिया अनोखा शृंगार करून पुरुषाला भेटण्यास जातात, तर पुरुषही मस्तपैकी शेव्हिंग करून, छान पेहराव करून स्त्रीकडे जातात. हे सर्वकाही चांगलं-चुंगलं, छानसं, मस्तममस्त वागणं बाहेरच्या व्यक्तीलाच वश करण्यासाठी असतं!
५)बाहेरख्यालीपणा वाढला की घरातील ख्याली-खुशाली विचारणे बंद होते आणि घरात उपाशी राहिलेली व्यक्तीसुद्धा बाहेर पडून एकनिष्ठत्वाचा उंबरठा ओलांडून सुख शोधण्याचा प्रयत्न करते. भूक लागली की अन्नाच्या शोधार्थ भटकणे हा निसर्गनियमच झाला, तो शारीरिक भूक भागविण्याकामी अमलांत आणला गेला तर त्यात वावगे वाटण्यासारखे काहीच नसावे!
--भोगगुरू कामदेव.   kaamvishva.blogspot.com  

No comments:

Post a Comment