Tuesday 13 December 2016

सेक्स आणि सुगंध...

सेक्स आणि सुगंध...

मन पुलकित होण्याचे एक कारण अल्हादी सुगंध हे असते. अचानक प्रफुल्लीत करणारा गंध आल्यास आपण इकडेतिकडे शोध घेऊ लागतो. प्रत्येक व्यक्तीला आपले स्वत्व अधोरेखित करणारा शारीरिक गंध किंवा सुगंध निसर्गतःच लाभलेला असतो. मानवी घ्राणेन्द्रीय असा व्यक्तीकेंद्रित  गंध चटकन ओळखू शकत नसले तरी त्या गंधाचा परिणाम मात्र वर्तनावर घडलेला दिसून येतो. असाच एक अनामिक गंध असतो, कामेच्छा अधीर करणारा!  –भोगगुरू कामदेव.   kaamvishva.blogspot.in
१)स्त्री-पुरुष नजीक आले की एकमेकांचे अतिसूक्ष्मसे शारीरिक गंध त्यांना त्यांच्याही नकळत उमजून येतात. ही व्यक्ती आपल्याला सुयोग्य आहे किंवा नाही याचा पडताळा मेंदूच्या लिम्बिक सिस्टीम नामक केंद्रात घेतला जातो. या गन्धामुळेच व्यक्ती एकमेकांवर अनुरक्त होतात असे शास्त्रज्ञांचे मत आहे.
२)तारुण्यात शरीराच्या संप्रेरकांच्या प्रभावामुळे अशा यौवनगंधाची रेलचेल शरीरात झालेली असते. याच गुंत्यात एकमेकांना आकर्षित करणारा एक सूक्ष्म गंध लपलेला असतो. आवडणारी व्यक्ती जवळ आली असता हा गंध अधिक परिणामकारकरीत्या स्रवू लागतो. तो सुगंध नजीक आलेल्या व्यक्तीला बरोब्बर उमजतो!
३)काही स्त्री-पुरुषांना सेंट किंवा डीओ वापरण्याची सवय असते. अशा व्यक्ती त्यांना स्वतःला आवडणारा सेंट किंवा डीओ मारतात. तो नजीक असणाऱ्या व्यक्तीस आवडेलच असे नाही. परंतु होते असे की जवळ आलेली व्यक्ती जर सर्वथा आवडत असेल तर तो सुगंध त्या व्यक्तीची ओळख म्हणून स्मरणात साठविली जाते आणि तो गंध अचानक आला तरी आवडत्या व्यक्तीची आठवण येऊन मन अधीर होऊन जाते!
४)सेक्स अगोदर होणारी प्रणयक्रीडा एकमेकांच्या यौवनगंधाचा परिचय होण्यासाठी उपयुक्त ठरते. मान, गळा, पाठ, छाती, पोट, मांड्या येथील गंधाच्या तुलनेत काखा आणि गुह्यभागाचा गंध अधिक प्रकर्षाने जाणवतो. तेथील विशिष्ट घर्मग्रंथी कडून हा यौवनगंध आवडत्या व्यक्तीच्या सान्निध्यात जास्त प्रमाणात स्रवला जातो. सर्वांगचुंबने घेतांना हा यौवनगंध नकळत मनावर कोरला जातो. नंतर इतरवेळी देखील तशाच गंधाच्या संपर्कात आल्यावर व्यक्ती कामोत्तेजित होऊ शकते असे सिध्द झाले आहे!
५)काही व्यक्ती शरीराला येणारा दर्प लपविण्यासाठी डीओ किंवा सेंट वापरतात. ते चुकीचे मुळीच नाही. धुम्रपान, मद्यपान, गुटखा आदी व्यसने करणाऱ्या व्यक्तींना हे आवश्यक वाटणे साहजिक आहे. पण अशा तात्पुरत्या मलमपट्टीची गरजच नसते. कारण व्यक्तीचा मूळचा ‘यौवनगंध’ संम्भोगादरम्यान व्यक्त होतच असतो. त्यामुळे डीओ च्या कितीही जाहिराती करून प्रोडक्ट माथी मारण्याचा उद्योग भरभराटीस येत असला तरी स्वत्व जपणारा यौवनगंधच नेहमी योग्य ते ‘काम’ करतो हे लक्षात ठेवावे!
--भोगगुरू कामदेव.   kaamvishva.blogspot.com  

No comments:

Post a Comment