Wednesday 21 December 2016

स्त्रीची ‘काम’स्मृती...

स्त्रीची ‘काम’स्मृती...

आजकाल स्त्रीला अनेक पुरुष मित्र असतात. त्यातील काही पुरुष नको इतके ‘जवळ’ येऊन गेलेले असतात! असे पुरुष सेक्सच्या वेळी कसे वागले, त्यांनी कसा सेक्स केला हे मात्र स्त्रीला बिलकुल आठवत नसते. तिच्या कामस्मृती कमकुवत असतात. कारण स्त्रीला प्रत्यक्ष सेक्स ऐवजी प्रणय, प्रेम, कामक्रीडा यात रस असतो. आवडणाऱ्या त्या पुरुषाच्या प्रेमस्पर्शाने आपण कसे रोमांचित होत गेलो, त्याच्या सहवासात आपण कसे चुरचुर होत गेलो याचीच आठवण स्त्रीच्या स्मृतीपटलावर रुंजी घालतांना आढळते... –भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)पूर्वायुष्यातील सेक्सविषयक घटना स्त्री विसरण्याचा प्रयत्न करते. त्या तिच्या आयुष्यातील दुर्घटनाच म्हणाव्यात असा तिचा एकंदर कल असतो. पुरुषाला ‘हवे’ ते मिळाले की तो स्त्रीची प्रतारणा करतो आणि ती पुन्हा एकाकी पडते. खरे तर तिला त्याच्याकडून सेक्सच्या बदल्यात शाश्वत आधार आणि प्रेम यांची अपेक्षा असते.
२)अपेक्षाभंगाचे ओझे बाळगून जगण्यात स्त्रीला स्वारस्य नसते. सद्य स्थितीला सामोरे जाण्यात स्त्री पुरुषापेक्षा नक्कीच खंबीर असते. त्यामुळे भूतपूर्व घटनेत रमण्याचा तिचा मानस उरत नाही, आलेल्या परिस्थितीला तोंड देत ती सद्य आयुष्यात असलेल्या पुरुषाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करते.
३)प्रेमात पडलेली स्त्री मात्र शृंगाराच्या अनेक कला अंगीकारून पुरुषाला कायम मोहित ठेवण्याचा व त्याने आपल्याशीच एकनिष्ठ राहण्याचा हेतू उराशी बाळगून राहते. त्यासाठी तिचे हरतऱ्हेचे प्रयत्न चालू असतात.
४)संबंधित पुरुषाला भेटायला जातांना आपण कोणती साडी किंवा ड्रेस परिधान केला होता हे मात्र चांगलेच आठवत असते. त्यावेळी त्याने आपल्यावर कसा प्रेमाचा वर्षाव केला, कोणते गिफ्ट दिले, आपल्याला समजावून घेतांना आपले कसे सांत्वन केले... वगैरे सारख्या आधार देणाऱ्या पुरुषाच्या कृती तिला आठवू शकतील.
५)स्त्री नैसर्गिकरीत्या सेक्सबाबतच्या स्मृतीला बांधील नसते. एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात अनेक पुरुष येऊन गेलेले असले तरी ती त्या पुरुषाबाबतच्या आठवणी जपण्याच्या मूड मध्ये नसते. तिला झाले गेले ते विसरून पुढे पुढे चालणे आवश्यक वाटते. ‘काम’स्मृतीचे स्मरणरंजन तिला सहसा आवडत नाही. पुरुषाने केलेला ‘सेक्सचा प्रकार’ स्मरणात ठेवण्याच्या भानगडीत स्त्री कधीच पडतच नाही!
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com  

No comments:

Post a Comment