Friday 9 December 2016

स्त्रीचे सहकार्य...

स्त्रीचे सहकार्य...

पुरुषाचे कामोत्तेजन जसे लवकर होते, तसेच तो स्त्रीच्या आधीच विर्यच्युती होऊन कामतृप्त होत असतो. स्त्रीचे सहकार्य लाभले तर अनेक अर्थांनी संभोग हा सम्यक भोग म्हणून घडवून आणता येतो. नाहीतर तो संभोग एकसुरी ठरण्याचा धोका असतो. कधी पुरुष उत्तेजित होऊन स्त्रीला पटकन रेडी होण्याची घाई करू लागतो तर कधी स्त्री अतृप्त राहिल्याने पुरुषाच्या झटकन विर्यच्युती होण्याच्या क्रीयेबाबत संभ्रम व्यक्त करते, प्रसंगी नाना शंका-कुशंका उपस्थित करते. पेरणी करायचीय पण मातीची मशागत नीट न झाल्याने पाउस पडूनही काही उपयोग होत नाही अगदी तसेच संभोगक्रियेबाबत घडते! हे टाळण्यासाठी स्त्रीचे संभोगासाठी यथोचित सहकार्य पुरुषाला अपेक्षित असते.
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)पुरुषाची कामोत्तेजक संवेदना स्त्रीपेक्षा सहापट अधिक वेगवान असल्याने शरीरसुखाच्या केवळ कल्पनेनेच तो उत्तेजित झालेला असतो. पुरुषाच्या मनातील जलद घडामोडींमुळे त्याचे लिंग तात्काळ ताठर बनते आणि तो स्त्रीकडे थेट संभोगाची मागणी करतो. याउलट स्त्री संथ गतीने संभोगाला तयार होणारी असल्याने दोघांचा हिरमोड होऊ शकतो. कैकवेळा पुरुषाला सांगून जमत नाही, त्याला संभोगापूर्वीची कामक्रीडा, प्रणयक्रीडा शिकवावी लागते!
२)वैवाहिक जीवनाच्या सुरुवातीला यशस्वी कामक्रीडा तडीस नेण्यात पुरुष असमर्थ ठरतो. तो नेहमी प्रत्यक्ष संभोगास आतुर असतो. यावेळी स्त्रीने त्याची मानसिकता लक्षात घेऊन स्वतःलाच ‘रेडीपझेशन’मध्ये ठेवणे गरजेचे ठरते. ते स्त्रीने समरसून केले तर दोघांनाही मिलनाचा परमानंद लाभेल.
३)उथळ पाण्याला खळखळाट फार असतो, हे पुरुषाच्या बाबतीत तंतोतंत जुळते. त्याची कामवृत्ती तत्पर, तातडीने, जलदतेने कार्यप्रवण होणारी असल्याने तो तात्काळ वीर्यस्राव करून मोकळा होण्याच्या वाटेने जातो. हे अनेक पुरुषांच्या बाबत घडत असते. यालाच ‘शीघ्रपतन’ म्हणतात. ही शीघ्रता टाळण्यासाठी सर्वस्वी स्त्रीचे सहकार्य गरजेचे ठरते. उधळणाऱ्या मत्त घोड्याला लगाम घालण्याचे मुख्य कार्य स्त्रीकडेच येते!
४)स्त्रीने पुरुषाला प्रणय कसा करावा, तिला पुरुषाने कसे, कोठे आणि कितपत (कामोद्दीपित करणारे) स्पर्श करावेत हे शिकवितांना पुरुष अतिरिक्त उत्तेजित होणार नाही याचीही काळजी घ्यावी लागते. स्त्रीने पुरुषाकडून स्वतःला आधी व्यवस्थित उत्तेजित करून घ्यावे आणि नंतरच पुरुषाला तयार करणे अपेक्षित आहे. म्हणजे उतू जाणारे दूध ज्योत कमी करून थोपविता येते, तसा हा प्रकार स्त्रीला आमलांत आणता येतो!
५)स्त्री नेहमीच कामातूर असत नाही. तिला अनेक प्रापंचिक जबाबदाऱ्यांची कसरत पार पाडावयाची असल्याने स्त्रीच्या मनात संभोगाची क्रिया केवळ दहाच टक्के उरलेली असते. त्यामुळे शयनगृहात शिरतांना तिला सर्व विचारांची जंत्री दाराबाहेर सोडूनच आत शिरावे लागते. उत्तेजित पुरुषाला व्यवस्थित हाताळून स्वतःही कामक्रीडेत रममाण होत पुरुषाच्या नैसर्गिक कामवृत्तीला सहकार्य केले तर संभोगक्रियेचा ‘सम्यक भोग’ होण्यास वेळ लागणार नाही...
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.com  

No comments:

Post a Comment