Monday 26 December 2016

स्त्रीचे अस्थैर्य...

स्त्रीचे अस्थैर्य...

पुरुषाला जेव्हा सेक्स हवा असतो तेव्हा स्त्री तयार असेलच असे नाही. पुरुषाने इच्छा व्यक्त केल्यावर स्त्री लगेच राजी होते असेही नाही किंवा पुरुष नेहमीच रेडी असतांना स्त्री मात्र अस्थिरता दर्शवून सेक्समध्ये रममाण होऊ शकत नाही. काय असतील स्त्रीच्या अस्थैर्याची करणे? स्त्री अशी का वागते? याचा पुरुषाने उलगडा करून घेतल्यास त्यालाही स्त्रीच्या स्थैर्यासाठी काहीतरी खटपट करून वैवाहिक जीवन सुखी करता येऊ शकते. –भोगगुरू कामदेव. kaamvishva.blogspot.com
१)स्त्री ही निसर्गतःच दुय्यम स्थानी आहे. स्त्रीला वंशवृद्धीसाठी पुरुषावर अवलंबून राहावे लागते. स्त्री काही शुक्रजंतू निर्माण करू शकत नाही. स्त्री सबला झाली, स्वयंपूर्ण झाली, स्वतंत्र झाली याचा कितीही डंका पिटविला जात असला तरी ते काही निसर्गाच्या कसोटीवर खरे ठरत नाही!
२)स्त्रीला जात्याच अपत्यप्राप्ती, अपत्याचे भरण-पोषण, संगोपन ही कार्ये करावीच लागतात. ते कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी स्त्रीमधील आईला बाळाला पाजल्याविना राहवत नसते. नवजात शिशूला कोणत्याही परिस्थितीत पुरुष स्तनपान करू शकत नसतो!
३)सारांश असा की स्त्रीला सेक्सव्यतिरिक्त अनेक व्यवधाने सांभाळावी लागतात. त्यामुळे तिचे बव्हंशी लक्ष संसारिक-प्रापंचिक कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडण्याकडे राहते. स्त्रीच्या विचारचक्रात सेक्सचा वाटा केवळ दहा टक्के उरतो, याउलट पुरुषाच्या विचार मंथनात नव्वद टक्के सेक्सचा विचार पाझरत असतो!
४)स्त्रीला पुरुषाकडून आधार, प्रेम आणि संरक्षण याची अपेक्षा असते. ते ज्या पुरुषाकडून मिळेल तिकडे ती आकर्षित होणे साहजिक आहे. त्यामुळे एखाद्या पुरुषाकडून उपरोक्त बाबींची पूर्तता होत नसल्यास तिचे सेक्सवरील स्थैर्य डळमळीत होत जाते. ती त्या पुरुषाच्या बाबतीत अस्थिरता दर्शवू लागते.
५)आजकाल विभक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात आल्याने स्त्रीला घरदार-ऑफिस-इतर कर्तव्ये वेळेत निपटावी लागतात. त्यामुळे सेक्सच्या बाबतीत ती पुरुषाला सहकार्य करेलच असे नाही. घरी कोणीच नसल्याने स्त्रीला व्यक्त होण्याचे माध्यम उपलब्ध होऊ शकत नाही. स्त्रीला गोतावळा आवडत असतो. अवती-भवती व्यक्ती असल्या म्हणजे तिला सुरक्षित वाटत असते, नेमके हेच मिळत नसल्याने ती अस्थिर होणे स्वाभाविक ठरते!
--भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in  

No comments:

Post a Comment