Friday 9 December 2016

शिस्नाचे कार्य...

शिस्नाचे कार्य...

निसर्गनियमानुसार पुरुषाने आपल्यासारखी प्रजा निर्माण करणे घडून येते. यासाठी पुरुषाचे लिंग हा अवयव महत्वाचे कार्य पार पाडत असतो. स्त्रीचे गर्भधारणेचे अवयव अंतस्थ असल्याने तिथपर्यंत शुक्राणू पोहचविणे हेच शिस्नाचे काम असते. एखाद्या पिचकारी सारखे शुक्रजंतू योनीत सोडले जाणे इतकेच कार्य लिंगाकडून अपेक्षित असते. हे अपोआप घडणे आणि मुद्दाम घडवून आणणे यात बराच फरक असतो. त्यासाठी पुरुषाचे लिंग कसे कार्य करते ते समजून घेणे आवश्यक आहे.
–भोगगुरू कामदेव.  kaamvishva.blogspot.in
१)पुरुषाला ठरवून लिंगात ताठरपणा आणताच येत नसतो. अमुक वाजून तमुक मिनिटांनी माझे लिंग ताठ झालेच पाहिजे असे ठरवून लिंग ताठ होत नसते. ही प्रक्रिया सर्वस्वी स्वायत्त मज्जासंस्थेमार्फत घडवून आणली जाते. त्यावर पुरुषाचे नियंत्रण नसते. त्यामुळे योग्य त्या कामोत्तेजक भाव-भावना निर्माण झाल्या तरच शिस्न ताठर होऊ लागते.
२)कामुक स्वप्नरंजन, स्त्रीची नग्नता पाहणे, लिंगाला कामुक स्पर्श होणे यांमुळे पुरुष कामोत्तेजित होतो व लिंगाकडील रक्तप्रवाह आपोआप वाढला जाऊन लिंग स्फुरण पावू लागते. शिस्नातील रक्तवाहिन्या तट्ट होऊन लिंगाची जाडी तसेच लांबी वृद्धिंगत होते.  अशावेळी योनीची घट्ट पकड लिंगावर बसत राहिल्यास ते आणखीनच कडक होत राहते.
३)ताठरलेल्या शिस्नातून चिकट असे चार पाच बिंदूस्राव बाहेर येतात. त्यांमुळे योनीतील लिंगाचा प्रवेश सुकर होऊ शकतो. लिंग योनीत प्रविष्ट केल्यानंतर पुरुष जघनभागाची मागेपुढे अशी हालचाल करू लागतो. या पुढेमागे होण्याने शिस्नाच्या कामसंवेदना अधिक वाढून उत्कट क्षणाची अनुभूती पुरुषाला येऊ लागते. लिंग खूपच ताठर होऊन योनीत खोलवर जाऊ लागते. सर्व शरीरात, नसांनसांत कामसंवेदना पसरू लागतात.
४)साधारणतः तीन मिनिटांपर्यंत ही स्थिती चालू राहिल्यास वीज चमकावी तशी अनुभूती लाभून पुरुषाचा बांध फुटतो व चार-पाच आचके शिस्नाला बसून वीर्यच्युती होते. या स्फोटक क्रियेवर पुरुषाचा अंमल चालत नसतो. कामसंवेदना पराकोटीला पोचल्या की विर्यच्युती होऊन जाते. ज्याप्रमाणे अनावर झालेली शिंक वेळीच आवरता येत नाही, त्याप्रमाणेच विर्यच्युती अजिबात थोपविता येत नाही. फारफार तर जघनभाग पुढेमागे करण्याची क्रिया काही क्षण थांबवून जवळ येणारा उत्कट बिंदू जरासा लांबविता येऊ शकतो.
५)पुरुषाची विर्यच्युती झाली की तो कामतृप्त होतो. शिस्न ढिले किंवा शिथिल पडू लागते. विर्यच्युती नंतर काही कालावधी जाईपर्यंत लिंग पुन्हा ताठ होऊ शकत नाही. त्यामुळे पोर्नक्लिप मध्ये दाखवतात तसे पुरुषाला एकाचवेळी अनेकदा विर्यच्युती घडवून कामतृप्ती लाभत नसते. चित्रफितीत जे दाखवतात ते अवास्तव आणि अशक्य असते. प्रत्यक्षात तसे घडत नाही. पुरुष तासनतास संभोग करू शकत नाही. बराच काळ संभोग चालू राहिला तर थकवा येऊन लिंग आपोआप शिथिल पडते.
--भोगगुरू कामदेव.   kaamvishva.blogspot.com  

No comments:

Post a Comment